खरीप हंगामासाठी 112 शेतकरी कुटुंबाना बियाणांचे वाटप मंगेश मोहिते
महाराष्ट्र

खरीप हंगामासाठी 112 शेतकरी कुटुंबाना बियाणांचे वाटप

कोरोनाने अनेक शेतकरी कुटुंबातील कर्ता पुरुष गमावले आहेत. सावनेर तालुक्यात साधारण 325 जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर: कोरोनाने (Coronavirus) अनेक शेतकरी कुटुंबातील कर्ता पुरुष गमावले आहेत. सावनेर तालुक्यात साधारण 325 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मृत्यू झालेल्यांमध्ये बहुतांश हे शेतकरी कुटुंबातील आहेत. याच कठीण प्रसंगात शेतकरी कुटुंबाना आधार देण्यासाठी मदतीचे एक पाऊल सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने उचलले आहे. या कुटुंबाना मदत म्हणून पैसे देण्याऐवजी खरीप हंगामासाठी लागणारी शेती निविष्ठा देण्यात आली आहे.

राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. आणि या उपक्रमअंतर्गत 112 कुटुंबाना ही मदत देण्यात आली आणि आज शेती निविष्ठा चं वाटप करण्यात आले. त्यांचा पाठीशी कुणीतरी खंबीर पाने उभं आहे अशी भावना यावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

असे या उपक्रमाबद्दल बोलताना मंत्री सुनील केदार म्हणाले. सावनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मका कापूस पिकावरील कीड नियंत्रण करण्यासाठीचे शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्यासह उपाध्यक्ष मनोहर कुंभारे हे उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना विविध पिकांच्या बियांचे वाटप करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT