यवतमाळ : शिवभोजन केंद्रातला किळसवाणा प्रकार, शौचालयात धुतली जात होती भांडी! SaamTVNews
महाराष्ट्र

यवतमाळ : शिवभोजन केंद्रातला किळसवाणा प्रकार, शौचालयात धुतली जात होती भांडी!

जिल्ह्यातील सर्व शिवभोजन केंद्रांची जिल्हास्तरीय पथक नेमून तात्काळ चौकशी करा; प्रहार जनशक्ती पक्षाची यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

~ संजय राठोड

यवतमाळ : राज्यात कोणीही उपाशी राहू नये गोरगरीब तसेच गरजूंना अल्पदरात भोजन उपलब्ध व्हावे या उद्देशाने राज्य शासनाने शिवभोजन (Shivbhojan) योजना सुरू केली. पण, काही शिवभोजन केंद्र चालकांकडून या उद्देशाला काळीमा फासण्याचे काम होत असल्याचा गलिच्छ प्रकार यवतमाळमधील (Yavatmal) महागाव (Mahagaon) येथे नुकताच उघडकीस आला आहे. (Yavatmal : Disgusting thing at mahagaon Shivbhojan Kendra, utensils were being washed in the toilet)

हे देखील पहा :

महागाव येथे एका शिवभोजन थाळी केंद्रावरील अस्वच्छता आणि व्यवस्थापनामध्ये त्रुटी समोर आल्या आहेत. या शिवभोजन केंद्रावर जेवणाची भांडी चक्क शौचालयांमध्ये धुतली जात असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. शौचालयात धुतलेल्या थाळीत पुन्हा भोजन दिले जात आहे. अशा शिवभोजन चालकाकडून गोर गरिबांची थट्टा केली जात असून त्यांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शिवभोजन केंद्राची जिल्हास्तरीय पथक नेमून तात्काळ चौकशी करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT