Petrol Diesel Prices Saam Tv
महाराष्ट्र

Petrol Diesel Prices : 5 राज्यांच्या निवडणुकीत चर्चा पेट्रोल- डिझेलच्या भावावर

सध्या देशात ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरू झाली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सध्या देशात ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरू झाली आहेत. निवडणुकीमध्ये पेट्रोल- डिझेलच्या भावाची (Petrol Diesel Prices) जोरदार चर्चा सुरू आहे. काही माध्यमांच्या वृत्तांच्या आधारे निवडणुकी झाल्यावर पेट्रोल- डिझेलच्या भावात मोठी वाढ होऊ शकते, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यानंतर या विषयाला चर्चेला उधाण आले आहे. (Discussion on petrol diesel prices 5 state elections)

या सर्वांमध्येच आयओसीएलने (IOCL) रविवारी देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे नवे भाव जाहीर केले आहेत. ७ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विक्रमी पातळीवर सुरू असलेल्या कच्च्या तेलाच्या भावात आज कोणताही बदल झाला नाही. मागील ३ महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर आहेत.

हे देखील पहा-

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भाव वाढत असून सरकारी तेल कंपन्यांना निवडणुकीच्या दबावाने भाववाढ करता आली नाही. असे असून देखील मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव अजून देखील सर्वाधिक म्हणजे ११० रुपयांच्या जवळपास आहेत. मेट्रो शहरे वगळता छोट्या शहरांमध्ये कंपन्या रोजच आपल्या भाव बदलत असतात.(Discussion on petrol diesel prices 5 state elections)

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) आज पेट्रोल (Petrol) ९५.४१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) ८६.६७ रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. मुंबईमध्ये (Mumbai) आज पेट्रोल (Petrol) १०९.९८ रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) ९४.१४ रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. पुण्यामध्ये (Pune) आज पेट्रोल (Petrol) १०९.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) ९२.५० रुपये प्रति लिटरवर इतके स्थिर आहे. पेट्रोलची सर्वाधिक भाव परभणीमध्ये असून प्रति लिटर ११२ रुपयांनी पेट्रोल विकण्यात येत आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरामध्ये आजच्या पेट्रोल-डिझेलचा भाव

- दिल्ली- पेट्रोल- ९५.४१- डिझेल- ८६.६७ रुपये

- मुंबई- पेट्रोल- १०९.९८- डिझेल- ९४.१४रुपये

- पुणे- पेट्रोल- १०९.७२- डिझेल-९२.५० रुपये

- नाशिक- पेट्रोल- १०९. ७९- डिझेल- ९२.५७ रुपये

- रत्नागिरी- पेट्रोल- ११०.९७- डिझेल-९३.६८ रुपये

- वाशिम- पेट्रोल- ११०.७१- डिझेल- ९३.४९ रुपये

- अहमदनगर- पेट्रोल- ११०.१२- डिझेल- ९२.९०रुपये

- रायगड- पेट्रोल- १०९.४८ - डिझेल- ९२.२५रुपये

- सोलापूर- पेट्रोल- ११०.५७ - डिझेल- ९३.३४ रुपये

- सांगली- पेट्रोल- ११०.०३- डिझेल- ९२.८३ रुपये

- अमरावती- पेट्रोल- १११.१४ - डिझेल-९३.९० रुपये

- गडचिरोली- पेट्रोल- ११०.५३ -डिझेल- ९३.३२ रुपये

-परभणी- पेट्रोल- ११२.४९- डिझेल- ९५.१७रुपये

- पालघर- पेट्रोल- १०९.७५- डिझेल- ९२.५१ रुपये

- कोल्हापूर- पेट्रोल- ११०.०९- डिझेल- ९२.८९ रुपये

- औरंगाबाद- पेट्रोल- ११०.३८- डिझेल- ९३.१४रुपये

- नागपूर- पेट्रोल- ११०.१०- डिझेल- ९२.९० रुपये

- सातारा- पेट्रोल- ११०.०३- डिझेल- ९३.८८रुपये

- सांगली- पेट्रोल- १०९.६५- डिझेल- ९२.८३रुपये

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT