'हॅलो मी D बोलतोय' महाळूंग-श्रीपूर नगरपंचायत निवडणुकीनंतर लागलेल्या पोस्टरची चर्चा!  SaamTvNews
महाराष्ट्र

'हॅलो मी D बोलतोय' महाळूंग-श्रीपूर नगरपंचायत निवडणुकीनंतर लागलेल्या पोस्टरची चर्चा!

सोलापूर जिल्ह्यातील महाळूंग श्रीपूर नगरपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीत भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

भारत नागणे

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील महाळूंग श्रीपूर नगरपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीत भाजपला (BJP) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. हा पराभव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यातच मी 'डी' बोलतोय, भाजपला मतदान करायचे नाही हे 'लक्षात' ठेवा. असे पोस्टर्स महाळूंग-श्रीपूर (Mahalung Shripur) मध्ये ठिकठिकाणी झळकली आहेत.

हे देखील पहा :

त्यामुळे भाजपच्या विरोधात मतदान करायला सांगणारा हा 'डी' कोण? याचीच चर्चा या परिसरात रंगली आहे. महाळूंग श्रीपूर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला (NCP) सहा जागा मिळाल्या आहेत. त्या तुलनेत भाजपला गटबाजीने घेरले होते.

नानासाहेब मुंडफने व भिमराव रेडे पाटील यांच्या गटाने प्रचारात मोहिते पाटलांच्या (Mohite-Patil) फोटोचा व नावाचा वापर केला होता. त्याचा फायदा या दोन गटांना झाला आहे. त्या तुलनेत भाजपच्या उमेदवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या फोटोंचा वापर आपल्या प्रचारात केला होता. अगदी शेवटच्या क्षणी भाजपने चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; कॅन्सरवर मात केली, पण काळाने केला घात, मनोरंजन विश्वात शोककळा

EPFO New Scheme : EPFO ची मोठी घोषणा! फक्त 6 महिन्यांसाठी नवी योजना, कोणाला मिळणार फायदा?

Maharashtra News Live Update: पालखी सोहळ्यात अल्पवयीन चालकांचा सहभाग? सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

Operation Tiger: ऑपरेशन टायगर ३.०, ठाकरेंचे आणखी १५ आमदार फुटणार; केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा

Healthcare Tips : दही खाण्याची योग्य वेळ काय? अवेळी खाल्ल्याने होईल मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT