Shirpur News Amrish Patel Saam tv
महाराष्ट्र

Shirpur News : भूसंपादन कार्यालयात आमदार अमरीश पटेलांची अचानक भेट; अधिकाऱ्यांना दिली तंबी

Dhule News : भूसंपादन कार्यालयात आमदार अमरीश पटेलांची अचानक भेट; अधिकाऱ्यांना दिली तंबी

भूषण अहिरे

धुळे : शिरपूरच्या भूसंपादन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमदार अमरीश पटेल (Amrish Patel) यांनी आज अचानकपणे (Shirpur) कार्यालयाला भेट दिली. येथे जावून अधिकाऱ्यांची झाडाझळती घेतली. (Latest Marathi News)

शिरपूरचे आमदार अमरीश पटेल यांच्याकडे भूसंपादन विभागाबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. यात प्रामुख्याने भूसंपादन कार्यालयातील कर्मचारी नियमित कार्यालयात उपस्थित राहत नाही. तसेच चुकीच्या नोंदी करून (Dhule News) नागरिकांना नाहक त्रास देणे व या कार्यालयात एजंटगिरी देखील मोठ्या प्रमाणात वाढली असल्याच्या तक्रारी वारंवार आमदार अमरीश पटेल यांना प्राप्त झालेल्या होत्या. या अनुषंगाने आमदार अमरीश पटेल यांनी या कार्यालयास भेट दिली. 

आमदार पटेल यांनी कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना तक्रारींसंदर्भात खडेबोल सुनावले. शिवाय यापुढे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित विभागाच्या मंत्र्यांना याबाबत कळविण्यात इशारा यावेळी आमदार अमरीश पटेल यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केडीएमसीत तीन समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड

Sharad Pawar: राहुरी पोटनिवडणुकीत शरद पवारांची मोठी खेळी, राष्ट्रवादीने दिले २ एबी फॉर्म

Bigg Boss Marathi 6: ‘टिकिट टू फिनाले’साठी तुफान राडा! सदस्यांमध्ये रंगणार काटे की टक्कर, पाहा व्हिडीओ

डोक्यावर पदर, हातात संविधान..; सावित्रीबाई फुलेंच्या वेशात ज्योती वाघमारेंची खासदारकीची शपथ, व्हिडिओ व्हायरल

Summer Dailywear Outfit: उन्हाळ्यात स्टायलिश आणि कूल दिसण्यासाठी हे 5 आऊटफिट नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT