Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur : सुरुंग फुटून अंगावर पडला दगड; शिरपूर तालुक्यातील जवानाला लद्दाख येथे वीरमरण

Dhule News : लद्दाख येथे कर्तव्य बजावत असताना सदरची दुर्दैवी घटना घडली आहे. यात लद्दाख येथे रस्त्याच्या काम सुरु असल्याने त्याठिकाणी दगड फोडण्यासाठी ठिकठिकाणी सुरुंग लावण्यात आलेले होते

भूषण अहिरे

धुळे : रस्त्याच्या कामासाठी दगड फोडण्यासाठी सुरुंग लावण्यात आला होता. हा सुरुंग फुटून उडालेला दगड याठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाच्या अंगावर पडला. यात देशसेवेत कर्तव्य बजावत असताना शिरपूर तालुक्यातील शेमल्या येथील जवानाचा मृत्यू झाल्याची घटना लद्दाख येथे घडली आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील शेमल्या येथील जवान दिनेश तुफान पावरा (वय ३०) असे वीरमरण प्राप्त झालेल्या जवानाचे नाव आहे. भारतीय सैन्य दलाच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये ते कार्यरत होते. दरम्यान लद्दाख येथे कर्तव्य बजावत असताना सदरची दुर्दैवी घटना घडली आहे. यात लद्दाख येथे रस्त्याच्या काम सुरु असल्याने त्याठिकाणी दगड फोडण्यासाठी ठिकठिकाणी सुरुंग लावण्यात आलेले होते.  

दोन वर्षांपूर्वीच अग्निवीर म्हणून सैन्यात  

दिनेश पावरा या जवानाने देशसेवा हीच मोठी सेवा मानत दोन वर्षांपूर्वीच भारतीय लष्करात अग्निवीर म्हणून सामील झाला होता. लडाख मध्ये भारतीय सैन्य दलाच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये कार्यरत असताना वीरमरण प्राप्त झाले आहे. दरम्यान त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच शेमल्या गावासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गावी होणार अंत्यसंस्कार 

दरम्यान सुरुंग लावला असताना तो फुटला. यामुळे उडालेला दगड अंगावर पडल्याने दिनेश पावरा यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. आज दुपारनंतर त्याचे पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी गावी आणले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई, वडील, तीन भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT