Shirpur News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur News : धक्कादायक..रेशनच्या तांदळात आढळले प्लास्टिक मिश्रित तांदूळ; भात खाल्ल्याने ग्रामस्थांना पोटदुखीचा त्रास

Dhule News : धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या थाळनेर येथील रेशन दुकानातून प्लास्टिकचे दाणे मिश्रित तांदळाची वाटप झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

भूषण अहिरे

धुळे : गोरगरिबांना मोफत धान्य मिळावे यासाठी रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ वाटप केले जातात. मात्र रेशनमध्ये येणारे धान्य चांगल्या दर्जाचे नसल्याने पुन्हा एकदा समोर आले आहे. यात रेशनमध्ये आलेल्या तांदळात प्लास्टिक मिश्रित तांदूळ असल्याचा धक्कादायक प्रकार शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे समोर आला.  

धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूरच्या थाळनेर येथील रेशन दुकानातून प्लास्टिकचे दाणे मिश्रित तांदळाची वाटप झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, नागरिकांना हा प्लास्टिक मिश्रित तांदळाचा भात खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास देखील झाला आहे. त्यानंतर नागरिकांनी हा सर्व प्रकार गावच्या सरपंचांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सरपंचांनी संबंधित रेशन दुकानात जाऊन स्वतः पाहणी करून हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे. 


चौकशीची मागणी 
सदरचे तांदूळ जाळले असता प्लास्टिक प्रमाणे हा तांदूळ एकमेकाला चिटकून त्याचा कोळसा झाला. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी सरपंचांनी लावला आहे. संबंधित (Ration Shop) रेशन दुकानात हा तांदूळ कसा आला आणि या प्लास्टिकच्या तांदळाची भेसळ कुणी केली? या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांसह थाळनेर येथील सरपंचांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT