Dhule Shirpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : घरफोडीच्या उद्देशाने फिरणारे ताब्यात; ९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Dhule News : शिरपूर तालुक्यातील पळासनेर घाटात काही संशयीत ईसम वाहनात फिरत असल्याची गोपनिय माहिती बातमीदारामार्फत शिरपुर तालुका पोलीसांना मिळाली होती.

Rajesh Sonwane

धुळे : घरफोडी करण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या चौघांच्या वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (dhule) त्यांच्याकडून गावठी कट्टा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. मात्र यातील दोघे फरार झाले असून फरार आरोपींचा (Shirpur) शिरपूर तालुका पोलीस शोध घेत असून, पुढील तपास शिरपूर पोलिसांतर्फे करण्यात येत आहे. (Live Marathi News)

शिरपूर तालुक्यातील पळासनेर घाटात काही संशयीत ईसम वाहनात फिरत असल्याची गोपनिय माहिती बातमीदारामार्फत (Shirpur Police) शिरपुर तालुका पोलीसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस मुंबई- आग्रा माहामार्गावर (Mumbai Agra Highway) पळासनेर घाटात पोहोचले. येथे पळासनेर शिवारातील भिलाट बाबा मंदिराच्या पुढे नाल्याजवळ संबंधित वाहन पोलिसांना मिळुन आले. पोलिसांनी या वाहनांची तपासणी केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाहनात सहा ईसम पोलिसांना आढळून आले. परंतु त्यातील दोघे इसम पसार होण्यात यशस्वी झाले असून, चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या चौघांकडून पोलिसांनी दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, त्याचबरोबर तीन जिवंत कार्तूस, चाकू तसेच मिरचीची पूड असे घरपोडीसाठी आवश्यक असलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. त्या कारवाईत जवळपास नऊ लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी या चोरट्यांकडून जप्त केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

SCROLL FOR NEXT