Shirpur News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur News : गुटख्याची अवैध वाहतूक; २८ लाखाचा मुद्देमाल जप्त

Dhule News : गाडी न थांबविता सुसाट वेगाने निघाला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करत सोनगीर (ता. धुळे) गावाजवळ कंटेनर पकडला.

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : गुजरात, मध्यप्रदेशमधून गुटख्याची अवैध वाहतूक केली जात असते. पोलिसांकडून अनेकदा (Shirpur) कारवाई झाल्यानंतर देखील पुन्हा एकदा मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटख्याची अवैध वाहतूक करणारा कंटेनर सांगवी पोलिसांनी (Police) जप्त केला. या कारवाई पोलिसांनी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

धुळ्याच्या (Dhule) सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना सेंधव्याकडून शिरपूरकडे पानमसालायुक्त गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे कारवाईचे आदेश दिले. ४ मेस सायंकाळी पोलिसांच्या पथकाने पळासनेर गावाजवळ असलेल्या चेक पोस्टवर संशयित कंटेनर चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र त्याने गाडी न थांबविता सुसाट वेगाने निघाला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करत सोनगीर (ता. धुळे) गावाजवळ कंटेनर पकडला. यानंतर चालक शौकीन चांद (वय ३५) याला ताब्यात घेतले. 

चालकाला कंटेनरमधील मालाबाबत विचारणा केली असता त्याने पानमसालायुक्त गुटखा व इतर ट्रान्स्पोर्टचा माल असल्याची माहिती दिली. कंटेनर पोलिस ठाण्यात आणून तपासणी केली असता त्यात पानमसाला व तंबाखू, जर्दा असा १३ लाख १५ हजार ५६ रुपये किमतीचा मुद्देमाल आढळला. १५ लाख रुपये किमतीच्या कंटेनरसह एकूण २८ लाख १५ हजार ५६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT