Dhule Crime News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: विहिरीत टाकण्याची धमकी देत काकाचा पुतणीवर अत्‍याचार; गर्भवती राहिल्‍याने प्रकार आला समोर

विहिरीत टाकण्याची धमकी देत काकाचा पुतणीवर अत्‍याचार; गर्भवती राहिल्‍याने प्रकार आला समोर

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : काकाने केलेल्या अत्याचारामुळे पुतणी गर्भवती झाल्याची घटना भोईटी (ता. शिरपूर) येथे घडली. संशयिताविरोधात सांगवी पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा करण्यात आला. (Tajya Batmya)

भोईटी परिसरातील (Shirpur) एका पाड्यावर पीडित १४ वर्षीय मुलगी कुटुंबासह राहते. सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी शेताच्या शेजारी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता संशयित बाठ्या चत्तरसिंह पावरा याने तिला पकडले. तिला विहिरीत ढकलून देण्याची धमकी देऊन कपाशीच्या शेतात ओढून नेत अत्याचार (Crime News) केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास ठार करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिता गप्प राहिली.

आईला संशय आल्‍याने समोर आली बाब

दीड ते दोन महिन्यांनी ती शेतात गायीसाठी चारा कापत असताना संशयित पुन्हा तेथे गेला. ती एकटी असल्याची संधी साधून त्याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, १४ मार्चला पीडिता आईला मदत करण्यासाठी गेली असता तिच्या पोटाकडे पाहून आईला संशय आला. तिने खोदून विचारल्यावर अत्याचाराबाबत पीडितेने माहिती दिली. तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित बाठ्या चत्तरसिंह पावरा याच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT