Shirpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur Crime News : पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू; व्यसन करून येत असल्याने झाला होता वाद

Dhule News : शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथे सदरची घटना १६ जुलैला दुपारी घडली. या घटनेत श्रावण काशीनाथ धनगर (वय ४३) याचा मृत्यू झाला आहे.

Rajesh Sonwane

शिरपूर (धुळे) : पती सतत व्यसन करून येत असल्याने पत्नी याला कंटाळी होती. दरम्यान पती- पत्नीमध्ये सातत्याने वाद उद्भवत होते. या दरम्यान पतीच्या व्यसनाला कंटाळून त्याला मारहाण केली. यात पतीचा मृत्यू झाल्याची घटना शिरपूर तालुक्यात घडली आहे. खून केल्याच्या संशयावरून थाळनेर पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. 

शिरपूर (Shirpur) तालुक्यातील कुरखळी येथे सदरची घटना १६ जुलैला दुपारी घडली. या घटनेत श्रावण काशीनाथ धनगर (वय ४३) याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान १६ जुलैला दुपारी श्रावण धनगर हा बेशुद्ध झालेला आढळला. ही बाब कळताच परिसरातील लोकांची गर्दी केली. तर श्रावणचा भाऊ गोकुळ धनगर याने पाहिले असता त्याच्या डोक्याच्या मागील भागात इजा होऊन रक्तस्राव झाल्याचे दिसून आले. त्याबाबत (Crime News) विचारल्यानंतर श्रावणची पत्नी संगीता धनगर हिने तो खाटेवरून पडल्यामुळे जखमी झाल्याचे सांगितले. 

मात्र तिच्या बोलण्यावरून संशय आल्यामुळे गोकुळ धनगर याने त्यांच्या शेजारी चौकशी केली. यात श्रावण व त्याच्या पत्नीमध्ये वाद झाल्याची माहिती मिळाली. श्रावणला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. श्रावणच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत श्रावणचा मृत्यू झाल्याचा संशय गोकुळ धनगर असल्याने या विरोधात (Police) पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून संगीता धनगर हिच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT