Shirpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Shirpur Crime : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडले; लाखोंची रोकड घेऊन चोरटे पसार

Dhule News : एटीएम मशीन फोडून रक्कम लांबविण्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसात वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. रात्रीच्या वेळी चोरट्यांकडून एटीएम मशीन लक्ष केले जात

भूषण अहिरे

धुळे : शिरपूर तालुक्यातील बोराडी गावातील एसबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या मशिनमधून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपये लंपास केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांकडून याचा तपास सुरु करण्यात आला आहे.

एटीएम (ATM) मशीन फोडून रक्कम लांबविण्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसात वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. रात्रीच्या वेळी चोरट्यांकडून एटीएम मशीन लक्ष केले जात असून गॅस कटरच्या सहाय्याने मशीन फोडले जात आहे. असाच प्रकार पुन्हा एकदा शिरपूर (Shirpur) तालुक्यातील बोराडी या गावात घडला आहे. रात्री चोरट्यानी एसबीआय बँकेचे एटीएम फोडून यातील रक्कम लांबविली आहे. सदरची घटना आज सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आली. यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. 

दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सदर एटीएम मशीन कॅबिनच्या काचा फोडून दरवाजा तोडला. तसेच गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले (Crime news) आहे. संशयीत चोरट्यांनी एटीएम मशीन कॅबिन बाहेर काढून रस्त्यावर फोडल्याचे दिसून आले असून, एटीएममधून लाखो रुपये काढून पोबारा केला. यापूर्वी देखील शिरपूर येथे चोरट्यांनी एटीएम मशीनवर डल्ला मारण्याची घटना उघडकीस आली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सांगवी पोलिस दाखल झाले. घटनास्थळाची विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT