Corona Free saam tv
महाराष्ट्र

Corona: धुळे, शिंदखेडा तालुका कोरोनामुक्त; एकही सक्रिय रुग्णाची नोंद नाही

धुळे, शिंदखेडा तालुका कोरोनामुक्त; एकही सक्रिय रुग्णाची नोंद नाही

साम टिव्ही ब्युरो

धुळे : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गुरुवारी (ता.२४) तर जिल्ह्यात एकही बाधित आढळून न आल्याने मोठा दिलासा मिळाला. विशेष म्हणजे धुळे तालुका व शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यात कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नसल्याची अहवाल नोंद असल्याने हे दोन्ही तालुके सध्यातरी कोरोनामुक्त (Corona Free) झाल्याचे म्हणता येते. (Dhule Shindkheda taluka Coronamukta No active patient)

जिल्‍हा प्रशासनातर्फे गुरुवारी (ता.२४) प्राप्त अहवालानुसार (Dhule News) जिल्हाभरात एकूण ५४७ अहवाल तपासण्यात आले. त्यातून एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येतही भर पडली नाही. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची (Corona) संख्या आजअखेर ५० हजार ७२७ आहे. तर कोरोनाबळींचा आकडा ६७४ आहे.

जिल्‍ह्यात आता १५ सक्रिय रुग्ण

दरम्यान, अद्यापही जिल्ह्यातील १३० जणांचे अहवाल प्रलंबित आहेत तर कोरोनाचे १५ सक्रिय रुग्ण आहेत. यात धुळे (Dhule) शहरात चार, शिरपूर तालुक्यात एक, साक्री तालुक्यात सहा तर इतर जिल्ह्यातील एका सक्रिय रुग्णाचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT