Crime : प्रेमसिंग गिरासे हत्या प्रकरण, मोठ्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर भूषण अहिरे
महाराष्ट्र

Crime : प्रेमसिंग गिरासे हत्या प्रकरण, मोठ्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर

शिंदखेडा तालुक्यातील दरणे येथील प्रेमसिंग राजेंद्र गिरासे या तरुणाचा चिमठाणे रस्त्यावर गेल्या दोन दिवसांपूर्वी दुपारी तीन वाजेच्या सुमारास खून करण्यात आला होता.

भूषण अहिरे

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील दरणे येथील प्रेमसिंग राजेंद्र गिरासे या तरुणाचा चिमठाणे रस्त्यावर गेल्या दोन दिवसांपूर्वी दुपारी तीन वाजेच्या सुमारास खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीसांनी खलाणे येतील तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. याबाबत आज दि 8 रोजी राजपूताना फाऊंडेशन महाराष्ट्र अध्यक्ष गिरीषसिंह परदेशी यांच्या नेतृत्वात शिंदखेडा शहरात बसस्थानक ते पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढण्यात आला.

हे देखील पहा :

मोर्चात मोठ्या प्रमाणात शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील जनसमुदाय उपस्थित होता. दरणे येथे भेट देऊन शिंदखेडा येथे पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेकडो युवक सहभागी झाल्याचे पाहण्यास मिळाले.

यावेळी माजी पर्यटन राज्यमंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी देखील या पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्याचबरोबर शिंदखेडा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतलेल्या तिघाची जणांवर कठोरात कठोर कलम लावण्यात यावेत त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये पकडल्या गेलेल्या तीनही आरोपींच्या कुटुंबियांना देखील सहआरोपी करण्यात यावे, तसेच हा खटला चालवण्यासाठी ऍड.उज्वल निकम यांची नियुक्ती करावी तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालविण्यात यावा व संबंधितांना फाशीची शिक्षा करण्यात यावी या मागण्या माजी मंत्री जयकुमार रावल यांनी निवेदनातून केल्या आहेत. हे निवेदन यावेळी शिंदखेडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT