Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : मोटरसायकल चोरी करणारी टोळी ताब्यात; १८ मोटारसायकली जप्त

Dhule News : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्र फिरवली असता साक्री येथील एका मोटरसायकल चोरट्यासह मालेगाव येथील दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

भूषण अहिरे

धुळे : मागील काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटना घडत होत्या. या दरम्यान साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीची घटना उघडकीस आली होती. याबाबत दाखल तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला असता चोरटा सापडून आला. तसेच मालेगाव येथून आणखी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. 

साक्री (Sakri) तालुक्यातील पिंपळनेर येथे झालेल्या मोटारसायकल चोरी संदर्भात पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना या मोटरसायकल चोरीची उकल करण्याचे आदेश दिले होते. यानंतर (Dhule LCB) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्र फिरवली असता साक्री येथील एका मोटरसायकल चोरट्यासह मालेगाव येथील दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

पोलिसांनी (Police) या तीनही चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे असलेल्या चोरीच्या सर्व १८ मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच या चोरट्यांकडून आणखी मोटरसायकल चोरीची उकल समोर येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT