Panjhara River Flood Saam tv
महाराष्ट्र

Panjhara River Flood : पुराच्या पाण्यातून पुलावरून दुचाकी नेण्याचा प्रयत्न अंगाशी; थोडक्यात बचावला दुचाकीस्वार

Dhule News : नदीला आलेल्या पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना त्यातून मार्ग काढणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. असाच प्रकार साक्री तालुक्यात पाहण्यास मिळाला. धुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यात दोन- तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. यात पांझरा नदीला देखील पूर आला असून पाण्याचा जोरदार प्रवाह नदीत आहे. दरम्यान पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना देखील या पुराच्या पाण्यातून दुचाकी धारक दुचाकी काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा प्रयत्न एकाच्या अंगाशी आला होता. मात्र स्थानिकांच्या मदतीमुळे सुदैवाने दुचाकी धारक बचावला आहे. 

नदीला आलेल्या पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना त्यातून मार्ग काढणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. असाच प्रकार साक्री तालुक्यात पाहण्यास मिळाला. धुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पांझरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये नांदवड- बेहेड फरशी पुलावरून देखील पुराचे पाणी वाहत आहे. यामुळे या पुलावरील वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. असे असताना देखील काही दुचाकीस्वार या पाण्यातून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. 

स्थानिकांच्या मदतीने बचावला 
नांदवड- बेहेड गावांना जोडणाऱ्या फरशी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी पुराच्या पाण्यामधून फरशी पुलावरून प्रवास करू नये; असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करत पुराच्या पाण्यामधून प्रवास करणे या दुचाकी धारकाच्या जीवावर बेतले होते. परंतु सुदैवाने परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत बचावकार्य करत या दुचाकी धारकाला वाचविले आहे.

वर्धा नदीच्या पुलावरून तीन फूट पाणी 

यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून कोसारा गावाजवळील वर्धा नदीच्या पुलावरून तीन फुट पाणी वाहत आहे. यवतमाळच्या मारेगांव तालुक्यातील माढेळी ते चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा कडे जाणारा मार्ग पुरामुळे बंद करण्यात आला आहे. यामुळे यवतमाळ- चंद्रपूर या दोन जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे. दरम्यान घटनास्थळी महसुल, पोलिस कर्मचारी तैनात असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रूपाली चाकणकरांचे रायगड कनेक्शननंतर राज्यात पुन्हा खळबळ; नेमके प्रकरण काय?

Belly Fat Loss: पोटावरची चरबी वाढत चाललीये? सकाळी १ ग्लास प्या हे ड्रिंक, आठवड्यातच जाणवेल फरक

Political News : खासदार होताच आमदारकीचा राजीनामा दिला, मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळणार?

Maharashtra Live News Update: कणकवली-नरडवे रोडवर कारला आग लागून कार जळून खाक

आमदारकी अन् मंत्रिपदासाठी खरातच्या दरबारी खेट्या, 8 वर्षांपासून संपर्क; चाकणकरांनंतर शिवसेनेच्या महिला नेत्या अडचणीत

SCROLL FOR NEXT