Sakri News Saam tv
महाराष्ट्र

Sakri News : दरोडेखोरांनी अपहरण केलेल्या तरुणीची सुटका; संशयित आरोपीही ताब्यात

Dhule News : साक्री शहरात २५ नोव्हेंबरच्या रात्री दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत दरोडा टाकला होता. घरात एक महिला व तरुणी अशा दोघेच घरात होत्या

भूषण अहिरे

धुळे : साक्री शहरामध्ये दरोडेखोरांनी सोने- चांदीच्या दागिन्यांसह तरुणीचे देखील अपहरण करून नेल्याची (Dhule) धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता सदर तरुणी ही मध्यप्रदेश येथील शेंदवा या ठिकाणी पोलिसांना आढळून आली आहे. शेंदवा पोलिसांनी (Police) तरुणीला शिरपूर ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (Live Marathi News)

साक्री शहरात २५ नोव्हेंबरच्या रात्री दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत दरोडा टाकला होता. घरात एक महिला व तरुणी अशा दोघेच घरात होत्या. दरोडेखोरांना विरोध केला असता त्यांच्यात झटपट झाली. तरी देखील दरोडेखोरांनी सोने व चांदीचे दागिने लांबवीले (Crime News) होते. तर महिलेचे हातपाय बांधून तोंडात रुमाल कोंबून तरुणीला घेऊन फरार झाले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी लागलीच तपासचक्रे फिरविण्यास सुरवात केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरोडेखोरांनी अपहरण केलेल्या तरुणीचा शोध घेतला. सदर तरुणी शेंदवा येथे आढळून आली. शेंदवा पोलिसांनी या तरुणीस शिरपूर ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले असून शिरपूर ग्रामीणच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तरुणीला साक्री पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेसंदर्भात पोलीस कसून तपास करीत असून काही संशयतांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच तरुणीची देखील विचारपूस करून तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर दरोडेखोरांचा शोध साक्री पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे घेण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT