Dhule Crime News Saam tv
महाराष्ट्र

Dhule crime : किरकोळ भांडणातून पत्नीचा खून; दारूच्या नशेत असलेल्या पतीचे कृत्य

Dhule News : सायंकाळी पत्नीने दारू पिऊन आलेल्या पतीला जाब विचारल्याचे रागातून ढकलू गायकवाड याने घरात असलेल्या धारदार भाजी कापण्याच्या विळ्याने पत्नीवर वार केले

भूषण अहिरे

धुळे : दारूचे व्यसन असल्याने रोज घरी दारू पिऊन यायचा. पत्नीचा याला विरोध होता. दरम्यान दारू पिऊन आलेल्या पाटील दारू पिऊन का आलास? याबाबत विचारणा केली. याचा राग आल्याने दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीवर विळ्याने वार केला. यानंतर डोक्यात बॅटरी टाकून तिची हत्या केल्याची घटना धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरात घडली. 

धुळे (Dhule) जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेरपासून जवळ असलेल्या धामणधर गावात ही घटना घडली असून, धाकलू चुनीलाल गायकवाड असे मारेकरी पतीचे नाव आहे. सायंकाळी पत्नीने दारू पिऊन आलेल्या पतीला जाब विचारल्याचे रागातून ढकलू गायकवाड याने घरात असलेल्या धारदार भाजी कापण्याच्या विळ्याने पत्नीवर वार केले. त्यानंतर घरात असलेली (Crime News) अवजड चार्जिंगची बॅटरी देखील मद्यपी पतीने पत्नीच्या डोक्यात मारल्याने या घटनेत पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

पत्नीची हत्या करून रात्रभर तसाच झोपला 

रात्री नशेच्या भरात पतीने हे कृत्य केल्यानंतर झोपी गेला. परंतु रात्रभर घरात रक्ताच्या थारोळ्यात पत्नी तशीच पडून होती. दरम्यान आजूबाजूच्या नागरिकांना ही बाब सकाळी समजताच त्यांनी तिच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली, त्यानंतर मृत महिलेच्या भावाने घटनास्थळी धाव घेत बहिणीला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याबाबत पिंपळनेर (Police) पोलिसांनी तात्काळ मारेकरी पतीच्या मुसक्या आवळल्या असून त्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

Maharashtra News Live Update: आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी एक महिना बंद

SCROLL FOR NEXT