Dhule Accident Saam tv
महाराष्ट्र

Dhule Accident : देव दर्शनावरून परतताना काळाचा घाला; कार अपघातात एकाचा मृत्यू, चार जण जखमी

Dhule News : जैन कुटुंब पौर्णिमेनिमित्त बळसाणे येथील जैनांचे तीर्थस्थानावर दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर हे कुटुंब सकाळी साडेसहाच्या सुमारास परत शिरपूरकडे मार्गस्थ झाले

Rajesh Sonwane

चिमठाणे (धुळे) : साक्री तालुक्यातील बळसाणे येथील जैन तीर्थ स्थळावर शिरपूर येथील कुटुंब दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतले असता त्यांच्या कारला अपघात होऊन यात एका जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चारजण जखमी झाले आहेत. सदर अपघात शिंदखेडा- चिमठाणे रस्त्यावर दरखेडा (ता. शिंदखेडा) फाट्याजवळ घडला. 

शिरपूर (shirpur) येथील पीयूषकुमार हुकूमचंद जैन (वय ५१) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. शिरपूर येथील जैन कुटुंब पौर्णिमेनिमित्त बळसाणे येथील जैनांचे तीर्थस्थानावर दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर हे कुटुंब सकाळी साडेसहाच्या सुमारास परत शिरपूरकडे मार्गस्थ झाले होते. त्यांची कार चिमठाणे- शिंदखेडा रस्त्यावर दरखेडा फाट्याजवळ आली असता रस्त्यालगत असलेल्या ८५ गाव पाणी पुरवठा योजनेच्या पाइपलाइनच्या मोठ्या लोखंडी पाइपाला धडकली. (Accident) त्यात चालका शेजारी बसलेले पीयूषकुमार जैन यांच्या डोक्याला मार लागून ते जागीच ठार झाले. 

चारजण जखमी 

या अपघातात त्यांची पत्नी किरण जैन (वय ४९), मुलगा विपुल जैन (वय २५), मुलगी दिव्या जैन (वय २६) व चालक जितेंद्र प्रवीण संकलेचा (वय २६) हे जखमी झाले आहेत. चारही जखमींना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताबाबत रोशन रमेशचंद टाटिया यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात खबर दिल्याने अपघाताची नोंद करण्यात आली. उपनिरीक्षक गुलाब ठाकरे तपास करीत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT