ram temple dhule  Saam tv
महाराष्ट्र

Ram Temple in Dhule: धुळ्यात अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती; धुळेकरांकडून अयोध्येचा अनुभव घेण्यासाठी हजारोंची गर्दी

Dhule Ram temple : मंदिर सर्वसामान्य लोकांसाठी खुलं झालं आहे. याच राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती धुळ्यात साकारण्यात आली आहे. राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती पाहण्यासाठी हजारा लोकांची गर्दी होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Dhule ram temple:

अयोध्येत काही दिवसांपूर्वी राम मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी हजारो प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली. त्यानंतर हे मंदिर सर्वसामान्य लोकांसाठी खुलं झालं आहे. याच राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती धुळ्यात साकारण्यात आली आहे. राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती पाहण्यासाठी हजारा लोकांची गर्दी होत आहे.

धुळ्यात भाजप नेते अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात अयोध्या मंदिराची प्रतिकृती तयार करून धुळेकरांसाठी दर्शन सोहळा घडवून आणला आहे. अयोध्याच्या राम मंदिरात प्रत्येकाला उपस्थित राहणे शक्य नव्हते. अनुप अग्रवाल यांनी या लोकांसाठी पांझरा नदीच्या पात्रामध्ये अयोध्या मंदिराप्रमाणे प्रतिकृती तयार केली. या मूर्ती आणि मंदिराचे दर्शन घडवून भविकांना अयोध्येत असल्याचीच भावना निर्माण करून दिली आहे.

धुळ्यात २२ जानेवारीपासून सलग १० दिवस मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. सोहळ्याच्या दिवशी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलं. राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामभक्तांनी घराघरात दिवाळी साजरी केली.

भाजप नेते अग्रवाल म्हणाले, 'अयोध्येती राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात लोकांसाठी आपल्या परिसरात निर्माण करायचं असं मनात आलं. त्यामुळे पांझरा नदीच्या पात्रात अयोध्येतील पावन राम जन्मभूमी मंदिराची प्रतिकृती उभारली. धुळे जिल्ह्यातील व खानदेशातील राम भक्तांना राम मंदिराची अनुभूती घेता यावी यासाठी हे मंदिर उभारलं'.

दरम्यान, अयोध्या राम मंदिर आंदोलनात सहभागी झालेले धुळे शहरातील कारसेवक यांचाही अनुप अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार केला गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT