Dhule ZP News Saam tv
महाराष्ट्र

Dhule ZP: जिल्‍हा परिषद महिला सदस्‍यावर हल्‍ला; निषेधार्थ काढला मोर्चा

जिल्‍हा परिषद महिला सदस्‍यावर हल्‍ला; निषेधार्थ काढला मोर्चा

भूषण अहिरे

धुळे : जिल्हा परिषदेच्या महिला सदस्या शालिनी भदाने यांच्‍यावर भ्याड हल्ला झाला. या हल्‍ल्‍याच्या निषेधार्थ आज (Dhule) सर्वपक्षीय महिला निषेध मोर्चा काढण्यात आला. यात महिलांची मोठ्या संख्‍येने उपस्‍थीती होती. (Maharashtra News)

गेल्या तीन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी दरम्यान (Shiv Sena) शिवसेनेच्या (Dhule ZP) जिल्हा परिषद सदस्य शालिनी भदाणे यांनी कुणालाही मतदान न करता तटस्थ भूमिका घेतली होती. यानंतर हा राग मनात धरून शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांतर्फे शालिनी भदाने यांच्यावर जिल्हा परिषदेच्या कार्यालयाबाहेर भ्याड हल्ला केल्याचा आरोप शालिनी भदाणे यांनी केला असून, या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय महिला निषेध मोर्चा काढण्यात आला आहे.

जिल्‍हाधिकारींना निवेदन

निषेध मोर्चा दरम्यान सर्वपक्षीय महिलांनी आपला सहभाग नोंदविल्याचे बघावयास मिळाले आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात मोर्चेकऱ्यांतर्फे निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून संबंधित हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 'वंदे मातरम्' विधेयक लोकसभेमध्ये मंजूर

तुम्ही लपून राहू शकत नाही, एक दिवस आम्ही तुम्हाला बाहेर आणू; मल्लिकार्जुन खरगेंचा PM मोदी-अमित शाहांना इशारा

शाळांमध्ये कोणत्या पदार्थांवर बंदी, वाचा संपूर्ण लिस्ट

600 कोटी रुपयांचं घबाड, 'ब्लॅक डायमंड सिटी'त ईडीची धाड; नोटांच्या बंडलांचा ढिगारा, बघा VIDEO

Delhi Protest: आंदोलनातील जखमींवर उपचार करा, पेलेट गन वापरण्याची SOP काय? सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारवर संतापले

SCROLL FOR NEXT