Dhule News Saam tv
महाराष्ट्र

तलवार, चाकू बाळगून असलेला तरुण पोलिसांच्‍या ताब्‍यात

तलवार, चाकू बाळगून असलेला तरुण पोलिसांच्‍या ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : दहशत माजविण्याच्या उद्देशाने सोबत तलवार व चाकू बाळगणाऱ्या 26 वर्षीय तरुणाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडे असलेली नऊ इंच तलवार व चाकू देखील (Police) पोलिसांनी हस्तगत केले आहे. (dhule news young man with a sword and a knife is in the custody of the police)

साक्री (Sakri) तालुक्यातील दुसाने येथे राहणारा 26 वर्षे तरुण हा आपल्याकडे दहशत माजविण्याच्या हेतूने तलवार व चाकू बाळगून असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला माहिती मिळाली होती. या माहितीच्या (Dhule News) आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधित तरुणाच्या घरी छापा टाकला. या छापा दरम्यान संबंधित तरुण पोलिसांना आढळून आला. तात्काळ पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत त्याच्याकडे असलेले चाकू व तलवार पोलिसांनी हस्तगत केली आहे. या संदर्भात निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये या तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास व चौकशी निजामपूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Early Morning Dreams: सकाळी पडणारे स्वप्न खरंच पूर्ण होतात का?

SCROLL FOR NEXT