Womens Day Saam tv
महाराष्ट्र

Womens Day: ‘ती’ मुलासारखी भक्कमपणे उभी; आई– वडीलांना जाणवू दिली नाही कमी

‘ती’ मुलासारखी भक्कमपणे उभी; आई– वडीलांना जाणवू दिली नाही कमी

भूषण अहिरे

धुळे : मुलगा अपेक्षित असताना मुलगी जन्माला आल्यानंतर निराश झालेल्या प्रियंकाच्या कुटुंबीयांसह गावातील नागरिकांनाही प्रियांकाचा अभिमान वाटू लागला आहे. महिला दिनाच्या (Womens Day) निमित्ताने प्रियंकाच्या वडिलांनी व गावातील महिलांनी प्रियंकाचा अभिमान वाटत असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रियंकाचा अभिमान वाटण्याच कारण तरी नेमकं काय चला बघूया.. (dhule news womens day story girl stands strong like child)

आपल्या देशामध्ये पुरुष प्रधान संस्कृती पूर्वीपासून चालत आली असल्याने महिलांना दुय्यम स्थान मिळाले होते. परंतु जसजसा काळ उलटू लागला त्यानंतर आता महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण करताना दिसून येत आहेत. अशाच प्रकारे धुळे (Dhule) जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये असलेल्या विटाई या गावामधील कृषिकन्या प्रियंका जोशी (Priyanka Joshi) हिच्या पालकांना व संपूर्ण गावाला प्रियंकाचा अभिमान वाटत आहे.

मुलासारखी भक्कमपणे सांभाळली

अभिमान वाटण्याचे कारण देखील तसेच आहे. प्रियंकाच्या आई- वडिलांना मुलगा अपेक्षित होता; परंतु त्यांना प्रियंका जन्माला आल्यानंतर काहीसे निराश झाल्यासारखे वाटले होते. परंतु प्रियंकाने आपल्या कर्तृत्वातून ती कुठल्याही मुलांपेक्षा कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. प्रियंकाचे कुटुंब हे शेतकरी कुटुंब असल्यामुळे शेतामध्ये वडिलांच्या सर्व कामांमध्ये मोठ्या जोमाने हातभार लावत आहे. शेत नांगरण्यासाठी ट्रॅक्टर चालवण्यापासून ते आपल्या शेतात पिकलेले पीक विदेशामध्ये पाठवण्यापर्यंतच सर्व काम प्रियंका भक्कमपणे पार पाडते आहे. डाळिंबाचे पीक घेण्यासाठी वडिलांसह तीने मोठी मेहनत घेतली होती. त्यानंतर त्यांच्या शेतामध्ये पिकलेले डाळिंब थेट परदेशात निर्यात केली.

राज्‍यपालांसमोर शेतकऱ्यांचे मांडले गाऱ्हाणे

शेतकऱ्यांच्या (Farmer) विविध प्रश्नांसाठी प्रियंकाने राज्यपालांसह कृषिमंत्र्यांची देखील वेळोवेळी भेट घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. केंद्र सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये कांद्यावरील निर्यात बंदी केल्यामुळे कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका सहन करावा लागला होता. अशा वेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे प्रियंकाने थेट राज्यपालांची भेट घेऊन राज्यपालांसमोर मांडले होते.

कोरोनात विद्यार्थ्यांसाठी सरसावली

कोरोणाच्या काळामध्ये सर्वत्र शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी प्रियंकाने तिच्या शेतामध्येच विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचे शिक्षण सुरु ठेवत शिक्षणाचे धडे गिरवण्यात विद्यार्थ्यांना मदत केली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अशा परिस्थितीत देखील न थांबल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांनी देखील प्रियंकाचे मनापासून आभार मानले. कुठल्याही क्षेत्रामध्ये व कुठल्याही कार्यामध्ये आपल्याला मुलांपेक्षा कमी न समजता मुलांपेक्षाही जास्त कार्य करण्याची उमेद ठेवणाऱ्या प्रियंकाला जन्म देऊन वडिलांना आता तिचा अभिमान वाटतो आहे. महिला दिनाच्या निमित्ताने प्रियंकाच्या वडिलांनी प्रियांका बद्दल वाटणारा अभिमान व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT