Dhule Crime News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: भल्‍या पहाटे घरात घुसून महिलेवर अत्याचार; गावठी कट्ट्याचा दाखविला धाक

भल्‍या पहाटे घरात घुसून महिलेवर अत्याचार; गावठी कट्ट्याचा दाखविला धाक

साम टिव्ही ब्युरो

धुळे : शहरातील जुने धुळे भागातील सुभाष नगर येथे गावठी कट्ट्य़ाचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार (Crime News) केल्याची धक्कादायक घटना रविवारी (२७ नोव्‍हेंबर) सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून संशयितालादेखील अटक केली. (Breaking Marathi News)

पीडित महिलेने आझादनगर (Dhule News) पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार २७ नोव्हेंबरला सकाळी चारच्या सुमारास चंद्रशेखर हुमचंद मराठे (वय अंदाजे ४०) याने महिलेच्या राहत्या घरात त्या एकट्या असल्याची संधी साधत प्रवेश केला. त्यानंतर महिलेला गावठी कट्ट्य़ाचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. रविवारी (ता.२७) सकाळी घटना उघडकीस येताच घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले.

संशयीत ताब्‍यात

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्री. बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला. पोलिसांनी महिलेची फिर्याद नोंदवून घेत संशयित चंद्रशेखर मराठे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी कट्टाही जप्त केला. त्याच्याविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Protest: दिल्लीत संसदभवन परिसरात आंदोलन, विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; पाहा VIDEO

पारंपारिक चव आणि आरोग्याचा खजिना असलेली लाल माठाची भाजी तुम्ही कधी खाल्लीये का? गावरान स्टाईल सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: अकोल्यात टॉवर चौकात वंचित कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आंदोलन

Heartburn Remedies: छातीत जळजळ झाल्यास हे 3 उपाय करताय तर आताच सावध व्हा; नाहीतर त्रास अजून वाढेल

Famous Actor Divorce : २० वर्षांच्या संसारानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट? अखेर त्याने सोडले मौन, म्हणाला...

SCROLL FOR NEXT