Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: गोरक्षकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या; पोलीस ठाण्यावर मोर्चा

गोरक्षकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या; पोलीस ठाण्यावर मोर्चा

भूषण अहिरे

धुळे : गोरक्षकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी कत्तलीसाठी जात असलेल्या जनावरांनी भरलेल्या वाहनास पकडून दिले. यानंतर संबंधितांनी गोरक्षकांवरच खोटे गुन्हे दाखल (Crime News) केल्याचा आरोप लावत पोलीस (Police) प्रशासनाचा निषेध करण्यासाठी गोरक्षा जन आंदोलन समितीच्या माध्यमातून (Sakri) साक्री व पिंपळनेर पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. (Live Marathi News)

साक्री तालुक्यातील (Navapur) नवापूर- साक्री रस्त्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी गोरक्षकांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांनी भरलेला टेम्पो अडवून साक्री पोलिसांच्या हवाले केला होता. त्यानंतर या तस्करांनी पोलिसांवर दबाव आणून गोरक्षकांवरच गुन्हा दाखल केल्याचा आरोप गोरक्षकांनी लावला आहे. या संदर्भात आज साक्री पोलीस ठाण्यावर त्याचबरोबर पिंपळनेर येथील पोलीस ठाण्यावर गोरक्षकांनी संघटनेच्यावतीने मोर्चा काढला आहे.

खोट्या गुन्ह्यासंदर्भात निषेध

यावेळी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने गोरक्षक सहभागी झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यासंदर्भात निषेध व्यक्त करणारे फलक देखील या गोरक्षकांच्या हातात झळकले असून गोरक्षकांवरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे; अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी पोलीस प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपाच्या अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रताप अडसड यांची वर्णी

नगरसेवक, नेते नव्हे तर अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन; राजकारणात खळबळ

Mumbai : मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! पाणी पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या २ धरणांच्या पातळीत वाढ

डोंबिवलीमध्ये मोठा घोटाळा उघड! जिल्हा परिषदेचा खोटा शिक्का वापरून इमारत ‘कायदेशीर’ दाखवली

Rutuja Bagwe: चिंब भिजलेले रुप सजलेले...; हिरव्या कॉटन साडीत रुतुजा बागवेचा मनमोहक अंदाज

SCROLL FOR NEXT