amrish patel 
महाराष्ट्र

धुळे ब्रेकिंग : अमरीशभाई पटेल बिनविरोध

धुळे ब्रेकिंग : अमरीशभाई पटेल बिनविरोध

भूषण अहिरे

धुळे : धुळे- नंदुरबार विधान परिषद मतदारसंघासाठी झालेल्‍या निवडणुकीत भाजपकडून पुन्हा अमरिश पटेल यांचा विजय झाला आहे. विजय निश्चित झाल्यानंतर अमरीश पटेल (Amrish Patel) यांच्या शिरपूर (Shirpur) येथील घराबाहेर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष केला.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या धुळे व नंदुरबार विधान परिषद मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षातर्फे येथील आमदार अमरीशभाई पटेल यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. अमरीशभाई पटेल हे २००९ पासून धुळे– नंदुरबार मतदारसंघातून विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करीत आहेत. तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पोटनिवडणुकीसाठी भाजपने त्यांना उमेदवारी दिली. त्यात देखील विजय मिळविला होता. आता सलग तिसऱ्यांदा ते उमेदवारी करीत आहेत.

कॉंग्रेस उमेदवाराची माघारी

धुळे– नंदुरबार विधान परिषदेकरीता भाजपकडून अमरीशभाई पटेल यांची उमेदवारी होती. त्‍यांच्‍या विरोधात महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसचे गौरव वाणी होते. मात्र आज वाणी यांनी माघारी घेतल्‍याने पटेल यांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makhana Vs Peanuts: मखाने की शेंगदाणे? नवरात्रीच्या उपवासाला काय खाणे अधिक फायदेशीर?

Blue Drum Verdict Case : निळ्या ड्रममधील हत्याकांडप्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय! मुस्कान आणि साहिलला सुनावली फाशीची शिक्षा!

Maharashtra News Live Update: पुण्यात पाणी कपातीविरोधात मनसेचे मटका फोड आंदोलन

Iphone Offer: 1 लाखाचा आयफोन फक्त 50 हजारांत, कुठे आहे ही भन्नाट ऑफर?

जमीन विकताना पत्नी, भाऊ मुलांची संमती आवश्यक आहे का? कायदा काय सांगतो?

SCROLL FOR NEXT