Dhule News Saam tv
महाराष्ट्र

वेदांत प्रकल्प गुजरात राज्यात; राष्‍ट्रवादीकडून निषेध आंदोलन

वेदांत प्रकल्प गुजरात राज्यात; राष्‍ट्रवादीकडून निषेध आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : महाराष्‍ट्रातील वेदांत प्रकल्प गुजरात राज्यात गेला आहे. याचा निषेध करण्यासाठी राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आक्रमक झाले असून, जिल्‍हाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन केले. (Dhule NCP News)

महाराष्ट्र राज्यात येऊ घातलेला वेदांत प्रकल्प गुजरात (Gujrat) राज्यात गेल्यामुळे महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुणांच्या रोजगारावर कुऱ्हाड राज्य सरकारने आणली. असे म्हणत राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्य सरकारचे निषेध करणारे फलक हातात धरून जिल्हाधिकारी (Dhule) कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्य सरकारने प्रकल्प गुजरात मध्ये नेऊन महाराष्ट्राच्या तरुणांवर अन्याय केला असल्याचे म्हणत या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

राज्‍य सरकारला परिणाम भोगावा लागेल

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जमलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून तीव्र निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर आगामी निवडणुकांमध्ये राज्य सरकारला याचा परिणाम भोगावे लागणार असल्याचे म्हणत राज्य सरकारचा निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT