Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त

भूषण अहिरे

धुळे : कोरोनानंतर दोन वर्षांनी जिल्ह्यात दहीहंडी होत आहे. जिल्ह्यात जवळपास 36 ठिकाणी दहीहंडी उभारली जात आहे. या दहीहंडी (Dahi Handi) उत्‍सवात काही अनुचित प्रकार होवू नये याकरीता दोन हजार पोलिसांचा (Police) बंदोबस्‍त लावण्यात आला आहे. (Dhule News Dahi Handi Utsav)

दहिहंडीसाठी धुळे (Dhule) जिल्ह्यातील विविध 17 पोलिस ठाण्यात परवानगीसाठी अर्ज देण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली तीन उप अधीक्षक, 12 पोलिस निरीक्षक 50 सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक यांच्यासह सुमारे 67 अधिकारी बंदोबस्तावर असणार आहेत. याशिवाय 1 हजार 245 पोलिस कर्मचारी, 500 पुरुष व 100 महिला होमगार्ड व 100 जवानांचा समावेश असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांची एक तुकडी असे एकूण 2 हजार 74 पोलिस व सुरक्षा कर्मचारी बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्याभरात दहीहंडीचा उत्सव साजरा करताना कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही, याची दक्षता पोलीस प्रशासनातर्फे घेतली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

"ओमराजे परत जा!" MPSC आंदोलनात शिंदेंच्या खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी, वातावरण तापले

SCROLL FOR NEXT