police 
महाराष्ट्र

एकाच कारचे दोन नंबर..म्‍हणून पोलिसांना आला संशय

एकाच कारचे दोन नंबर..म्‍हणून पोलिसांना आला संशय

भूषण अहिरे

धुळे : पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना एकाच कारचे दोन नंबर असल्‍याचे लक्षात आले. यानंतर पिंपळनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईत विविध कंपन्यांच्या दारूसाठ्यासह ११ लाख ३६ हजाराहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. (dhule-news-two-numbers-of-the-same-car-police-got-suspicion-and-Alcohol-confiscated)

साक्री (Sakri) तालुक्यातील पिंपळनेर पोलीस (Police) कुडाशी ते वारसा या परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना एका कारकडे अचानक अधिकाऱ्यांचे लक्ष गेले. या कारचा पुढील बाजूचा नंबर तसेच मागील बाजूला असलेला नंबर हे दोन्ही वेगवेगळे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी या वाहनाजवळ जाऊन चौकशी केली. परंतु वाहनामध्ये असलेला वाहन चालक पोलीस येत असल्याचे बघून गाडी सोडून पसार झाला. या चालकाचा पोलिसांनी पाठलाग केला. परंतु हा वाहन चालक पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला.

११ लाखाचा माल हस्‍तगत

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाहून आणलेला मद्याचा साठा आढळून आला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी जवळपास ११ लाख ३६ हजाराहून अधिकचा मुद्देमाल पिंपळनेर पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध कंपन्यांची दारू पोलिसांनी हस्तगत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT