Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

चाकूचा धाक दाखवत घरातून लुटला लाखोंचा ऐवज

चाकूचा धाक दाखवत घरातून लुटला लाखोंचा ऐवज

भूषण अहिरे

धुळे : शहरातील जामचा मळा या परिसरामध्ये पहाटेच्या वेळी दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे. दरोडेखोरांनी घरामध्ये महिला एकटी असल्याचा फायदा उचलत महिलेच्या पोटाला व मानेला चाकू लावून (Crime News) घरातील दोन लाख रुपये रोकड व सोन्या-चांदीचे दागिने चोरून पोबारा केला आहे. (dhule news two lakh cash robbery from the house out of fear of knives)

पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान रोजच्या (Dhule News) सवयीप्रमाणे महिला मॉर्निंग वॉकसाठी उठली. मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी अजून थोडा वेळ असल्याने दरवाजा तसाच उघडा सोडून महिलेने पुन्हा घरात प्रवेश केला. ही संधी साधत चोरट्यांनी हलक्या पावलाने घरामध्ये प्रवेश केला व महिलेचे लक्ष जाताच महिलेच्या पोटाला व मानेला चाकू लावून शांत बसण्यास सांगितले.

दोन लाखाची रक्‍कम व दागिने लंपास

त्यानंतर चोरट्यांनी घरातील जवळपास दोन लाख रुपये रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने चोरून पोबारा केला आहे. चोरटे गेल्यानंतर महिलेने शेजारच्यांना सर्व घटनाक्रम सांगितला, त्यानंतर चाळीसगाव रोड पोलिसांना (Police) या घटनेची माहिती देण्यात आली असून चाळीसगाव रोड पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

Panhala Fort : कोल्हापूरची शान! पन्हाळा किल्ल्याची 'ही' रहस्ये तुम्हाला माहीत आहेत का? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT