Dhule News
Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: ११११ फूट लांबीचा झेंडा घेऊन काढण्यात आली तिरंगा रॅली

भूषण अहिरे

धुळे : स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त धुळे शहरातून आज भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या तिरंगा रॅली दरम्यान 1 हजार 111 फुट लांबीचा तिरंगा झेंडा खांद्यावर घेऊन धुळे (Dhule) शहरातून या भव्य रॅलीला सुरुवात करण्यात आली. (Dhule News Indian Flag)

भारताच्या स्वातंत्र्यासाठी (Independence Day) बलिदान देणाऱ्या थोर स्वातंत्र्यसैनिकांची आठवण करून देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक धुळे भाजपा (BJP) जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी सांगितले. या रॅलीदरम्‍यान सहभागींनी भारत माता की जय..घोषणाबाजी केल्‍याने परिसरात स्‍वातंत्र दिनाचे वातावरण निर्माण झाले होते.

धुळेकरांचा सहभाग

धुळे शहरातील अग्रसेन पुतळा परिसरातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर धुळे शहरातील सर्व मुख्य बाजारपेठा व चौकांमधून ही भव्य रॅली मार्गस्थ करण्यात आली. या रॅली दरम्यान भारत माता की जय या घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता. या भव्य तिरंगा रॅलीमध्ये धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह महापौर प्रदीप कर्पे, खासदार सुभाष भामरे सहभागी झाले होते. त्याच बरोबर हजारोंच्या संख्येने धुळेकर नागरिक देखील या तिरंगा रॅलीत सहभागी झाले असल्याचे बघावयास मिळाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Gets Emotional: आईच्या निधनानंतर...,गंगा नदीकाठावर पूजेनंतर PM मोदींच्या डोळ्यांत पाणी!

Today's Marathi News Live :नरेंद्र मोदींच्या रोड शोच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

Special Report : Kal Maharashtra | वकील बाजी मारणार की प्रध्यापक भाकरी फिरवणार? असं आहे उत्तर मध्य मुंबई मतदासंघाचं गणित

Water Crisis : पाण्यासाठी वसमतमध्ये महिलांचा पालिकेवर हंडा मोर्चा; वणी शहरातही बारा दिवसाआड पाणी पुरवठा

RCB vs CSK, IPL 2024: बंगळुरुच्या फॅन्ससाठी चिंता वाढवणारी बातमी! RCB vs CSK सामना रद्द होण्याची शक्यता; वाचा कारण

SCROLL FOR NEXT