Dhule News Bharat Jodo Yatra Saam tv
महाराष्ट्र

Dhule: भारत जोडो यात्रेसाठी धुळ्यातून हजारो कार्यकर्ते रवाना

भारत जोडो यात्रेसाठी धुळ्यातून हजारो कार्यकर्ते रवाना

भूषण अहिरे

धुळे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या माध्यमातून सध्या महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा सुरू आहे. या पदयात्रेला (Dhule) धुळेकरांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याचे बघावयास मिळत आहे. दरम्यान (Washim) वाशिम येथे भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी धुळ्यातून हजारो कार्यकर्ते रवाना झाले आहेत. (Maharashtra News)

धुळे शहरातील एसएसव्हीपीएस कॉलेजपासून बाईक रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. काँग्रेसचे (Congress) धुळे ग्रामिणचे आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्यावर वाशिम येथील पदयात्रेची जबाबदारी सोपविण्यात आली. यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह आमदार कुणाल पाटील यांच्या समर्थकांनी देखील या पदयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला आहे.

समविचार पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी

संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर समविचारी पक्षांचे देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी धुळ्यातून मार्गस्थ झाले आहेत. यावेळी महाविकास आघाडी मधील तीनही पक्षाचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी असल्याचे बघायला मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT