Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule : धुणीभांडी करणाऱ्या महिलेच्या घरात धाडसी चोरी; मोलमजुरीतून कमावलेली सर्व जमापुंजी गेली

Dhule News : सकाळी कुटुंबीय खाली असता घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर घरात चोरी झाली असल्याची माहिती कुटुंबीयांना समजल्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली

भूषण अहिरे

धुळे : बंद घर असल्याची संधी साधत चोरटे हात साफ करत असतात. असाच प्रकार धुळे शहरात घडला आहे. रात्री उकाडा वाटत असल्याने झोपण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य घराच्या टेरेसवर झोपण्यासाठी गेले. यामुळे खाली घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यानी हात साफ करत दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. 

धुळे शहरातील बिलाडी रोड वरील सुगंधा आकर्षण सोसायटीत राहणाऱ्या उषाबाई गोविंद मेटकर यांच्या घरात रात्री चोरीची घटना घडली आहे. उषाबाई मेटकर या दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करण्याच्या कामासाठी जात असतात. दरम्यान दोन दिवसांपासुन उकाड्यात वाढ झाल्याने रात्री अनेकजण गच्चीवर झोपण्यासाठी जात असतात. त्यानुसार उषाबाई या देखील घराचे कुलूप लावून वरती छतावर झोपायला गेले होते. 

एक लाखाच्या दागिन्यांसह रोकड लांबविली 

दरम्यान चोरट्याने रात्री घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर कपाटातील एक लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख रुपये रोकड लंपास केली आहे. सकाळी कुटुंबीय खाली असता घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर घरात चोरी झाली असल्याची माहिती कुटुंबीयांना समजल्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ देवपूर पोलीस विविध तपास यंत्रणा सह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून चोरट्यांचा पुढील तपास देवपूर पोलीस करीत आहेत.

जमापुंजी गेली 

सुगंधा आकर्षण सोसायटीमध्ये रहिवासी असलेल्या उषाबाई मेटकर या दुसऱ्यांच्या घरी धुणं भांडी करण्याचे काम करतात. यातून मिळणारा पैसे जमवत दागिने केले होते. तर काही रोख रक्कम कपाटात ठेवली होती. चोरट्याने हि सर्व रक्कम चोरून नेल्याने महिलेची सर्व जमापुंजी गेली आहे. यामुळे महिलेने आक्रोश केला होता. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

SCROLL FOR NEXT