Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: मनपा शाळेची खिडकी फोडून दोन प्रोजेक्टरांची चोरी

मनपा शाळेची खिडकी फोडून दोन प्रोजेक्टरांची चोरी

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील बारापत्थर परिसरात असलेल्या धुळे महानगरपालिका (Dhule Corporation) शाळा क्रमांक आठ येथे डिजिटल रूम आहे. या रूमची खिडकी तोडून चोरट्याने शाळेमध्ये प्रवेश करत दोन प्रोजेक्टर आणि एक पेपरांची मोठी पिशवी चोरून (Theft) पोबारा केला आहे. (Live Marathi News)

धुळे शहरातील बारापत्‍थर परिसरात महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक आठ आहे. या शाळेच्या डिजिटल रूममध्ये दोन प्रोजेक्टर लावलेले होते. महाशिवरात्री आणि शिवजयंतीची सुट्टी असल्याने शाळा दोन दिवसापासून बंद होती. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने डिजिटल रूमची खिडकी तोडून आत मध्ये प्रवेश केला आणि दोन महागडे प्रोजेक्टर आणि एक पेपरची पिशवी चोरून पोबारा केला.

शाळा उघडल्‍यानंतर आले लक्षात

डिजीटल रूमच्‍या आतमध्ये असलेले सामानही चोरट्यांनी अस्ताव्यस्त केले आहे. हा सर्व प्रकार आज शाळा उघडल्‍यानंतर लक्षात आला. यानंतर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बाभुळगांव वरून आंदोलक विद्यार्थी अमरावतीसाठी रवाना

Shocking : "..तू पण माझ्यावर प्रेम कर" एकतर्फी प्रेमातून तरुणीने संपवले आयुष्य; सांगलीतील धक्कादायक घटना

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

Famous Actor : मृत्यूच्या दाढेतून परतला प्रसिद्ध अभिनेता! "काही तासांपूर्वी आम्ही तिथेच होतो..." सांगताना अंगावर आला काटा

Actress Injured: चेहऱ्यावर सूज अन् ओठांवर जखमा! प्रसिद्ध अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते हादरले; सांगितला धक्कादायक अनुभव

SCROLL FOR NEXT