Dhule Crime News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: सोलर प्‍लांटमधील कॉपर केबल चोरी; टोळी पोलिसांच्‍या ताब्‍यात

सोलर प्‍लांटमधील कॉपर केबल चोरी; टोळी पोलिसांच्‍या ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : घराच्‍या छतावर बसविलेल्‍या सोलर प्लांटमधून कॉपर केबल व सोलर प्लेट चोरी केली जात होती. याबाबत पोलिसांनी तपासचक्र फिरवून चोरी (Theft) करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुस्क्या आवळल्या आहेत. (Dhule Crime News)

साक्री (Sakri) तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोलर प्लांटमधील कॉपर केबल व सोलर प्लेट चोरी जात असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यासंदर्भात संबंधित (Police) पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील नोंदविण्यात आलेली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने निजामपूर पोलिसांनी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे तपासाची चक्र फिरवली. भामेर या गावातील दोन जण या चोरीमध्ये सहभागी असल्याचे उघडकीस आले. स्थानिक गुन्‍हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या दोघांच्याही मूसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून कारसह तीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

विकत घेणारेही ताब्‍यात

चोरी करून हे दोघेही चोर आणखी काही जणांना विकत असल्याची देखील माहिती उघडकीस आली होती. या अनुषंगाने विकत घेणाऱ्या तीन जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून या कारवाईमध्ये एकंदरीत पाच जणांच्या मुस्क्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आवळल्या असून आणखी चार जणांचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT