मस्जिदे नबवी 
महाराष्ट्र

तरुणाने साकारली मस्जिदे नबवीची प्रतिकृती

तरुणाने साकारली मस्जिदे नबवीची प्रतिकृती

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील मुस्लिम तरुणाने गेल्या दोन वर्षांपुर्वी सौदी अरेबिया येथील साकारलेल्या हरम शरीफ (हज) च्या प्रतिकृतीनंतर आता पुन्हा मस्जिदे नबवीची प्रतिकृती साकारली आहे. (dhule-news-The-young-man-built-a-replica-of-Masjid-Nabavi-in-Saudi-Arabia)

धुळे शहरातील मौलवी गंज परिसरात राहणारे अजीम नवाब अन्सारी यांनी दोन वर्षांपूर्वी सौदी अरेबियामध्ये मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेले हरम शरीफ (हज्ज, काबा)ची हुबेहूब प्रतिकृती साकारली होती. या प्रतिकृतीचे देशभरातून मुस्लिम बांधवांसह इतर धर्मियांच्या नागरिकांनी देखील अजीम नवाब अन्सारी यांचे कौतुक केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अन्सारी यांनी नागरिकांच्या आग्रहास्तव सौदी अरेबियामधील मुस्लिम बांधवांचे पवित्र मानले जाणारे धार्मिक स्थळ मस्जिदे नबवीची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.

प्रतिकृतीची पाहणी केली तर मिळेल संपुर्ण माहिती

मस्जिदे नबवी या प्रार्थना स्थळाला भेट देण्यासाठी जगभरातून मुस्लिम बांधव सौदी अरेबिया याठिकाणी जात असतात. परंतु त्याठिकाणी पोहोचल्यानंतर या प्रार्थनास्थळाची पूर्णपणे माहिती नसल्यामुळे बहुतांश वेळ भाविकांचा त्या ठिकाणी माहिती घेण्यातच जात असतो. त्यामुळे मुस्लिम बांधवांची मोठी तारांबळ देखील उडते. मुस्लिम बांधवांची हीच अडचण लक्षात घेता अन्सार यांनी मस्जिदे नबवी या प्रार्थना स्थळाची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे. सौदी अरेबियामध्ये या प्रार्थनास्थळाला भेट देण्यापूर्वी मुस्लिम बांधवांनी किंवा इतर पर्यटकांनी या प्रतिकृतीची पाहणी केली. तर नक्कीच भाविकांना सौदी अरेबियामध्ये गेल्यानंतर उडणारा गोंधळ टाळता येणे शक्‍य होणार असल्याचे अन्सारी यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT