fire 
महाराष्ट्र

पेट्रोल ओतून घराला लावली आग

पेट्रोल ओतून घराला लावली आग

साम टिव्ही ब्युरो

धुळे : मागील भांडणाच्या वादामुळे दिलेली फिर्याद मागे घेतली नाही याचा राग धरून संशयित तिघांनी जनता सोसायटीतील घराला सोमवारी पहाटे आग लावल्याची तक्रार आहे. या प्रकरणी मोलकरीण रुक्साना बानो शेख सलीम (वय ४०) या महिलेने चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार नदीम काल्या ऊर्फ नदीम रज्जाक शेख (रा. जनता सोसायटी), हमीद नाट्या, वसीम रंधा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. (The house was set on fire by pouring petrol)

पोलिस ठाण्यातील फिर्यादीनुसार दागदागिने, शैक्षणिक व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसह हसीना बी अस्लम खाटीक यांचे संसारोपयोगी साहित्यासह आठ लाख रुपयांचे नुकसान, तीन बकऱ्या, कल्लू अन्सारी अब्दुला अन्सारी यांचे दोन लाखांचे नुकसान, निसार शेख यांचे तीन बकऱ्यांसह दहा लाखांचे नुकसान, मोहम्मद सलीम अब्दुल गफ्फार यांचे दहा लाखांसह रोकड, मोइदोद्दीन गुलाम रसूल खाटीक यांचे आठ लाखांसह २५ हजार रोख, शाकीराबी आरिफ शहा यांचे सात लाखांसह ७० हजार रोख रुक्सानाबी यासीन शहा यांचे दहा लाखांसह एक लाखाची रक्कम, आयशाबानो मोहम्मद अन्सारी यांचे पाच लाखांसह वीस हजाराची रोकड, नियाज सय्यद अस्लम यांचे दहा लाखांच्या नुकसानीसह पाच लाखाची रोकड आगीत खाक झाली आहे.

मागील भांडणावरून वाद

संशयितांचा फिर्यादीच्या वहिनी नसीम बानो हिच्याशी मागील भांडणावरून वाद झाला. पोलिसांकडे केलेली तक्रार मागे घेतली नाही म्हणून संशयितांनी नसीम बानो हिच्या घरात घुसून प्लास्टिकच्या बाटलीत पेट्रोल ओतून आग लावली. त्यामुळे सर्व नऊ घरांना आग लागून नुकसान केले. जनता सोसायटीतील संशयित नदीम काल्या (वय १९) याच्याविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा मागे घ्यावा, अन्यथा फिर्यादीच्या वहिनीचे घर जाळून टाकीन, जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. रविवारी (ता.५) रात्रीही वाद झाला. त्यानंतर पहाटे आगीची घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या बसची चावी घेऊन ठोकली धूम; जंतर-मंतरवर महिलेचं कृत्य पाहून पोलीस चक्रावले, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी पप्या शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ; 9 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

SCROLL FOR NEXT