Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: अवैध सावकारीचा दहावा गुन्हा दाखल

अवैध सावकारीचा दहावा गुन्हा दाखल

साम टिव्ही ब्युरो

धुळे : अवैध सावकारी प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. १८) नववा गुन्हा दाखल झाला. यात साडेसात लाख घेतल्यानंतर १८ लाखांची परतफेड झाल्यावरही मुद्दल व व्याजाचा मुद्दा उकरून संबंधित अवैध सावकारांनी ५० हजाराच्या (Dhule News) खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यामुळे पठाणी वसुलीतून गरीब, गरजू सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक शोषण करणाऱ्यांवर पोलिसांनी (Police) कठोर कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादींकडून होत आहे. (dhule news Tenth police case of illegal lending filed)

धुळे (Dhule) शहरात काही दिवसांतच अवैध सावकारी प्रकरणी पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात गर्भवती महिलेला मारहाण, आर्थिक गुन्हे शाखेकडे व्यावसायिकाला मारहाणीतून कर्णबधिर करणे, तसेच आझादनगर, शहर पोलिस आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे मिळून राजेंद्र बंब याच्याविरुद्ध एकूण सहा गुन्हे, शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी आणि शनिवारी मिळून रामबापू बागूल, नीलेश हरळ याच्याविरोधात दोन, असे मिळून आतापर्यंत एकूण दहा गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तक्रारदार पीडित नागरिक पुढे येत आहेत.

रामबापूचा दुसरा कारनामा

ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने रामबापू बागूल व नीलेश हरळ याच्याविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल केल्यानंतर शहरातील बिसलेरी बॉटलचे होलसेल विक्रेते हेमंतकुमार सुभाष पाटील (वय ३८) यांनी अवैध सावकार गणेश ऊर्फ रामबापू बागूल, नीलेश हरळ याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल केला. तक्रारदार पाटील यांनी या संशयित दोघांकडून एकूण साडेसात लाखाचे रोख कर्ज सरासरी सहा ते दहा टक्के व्याजाने घेतले. त्यासाठी कोरे धनादेश दिले. त्यानुसार पाटील यांनी वेगवेगळ्या स्वरूपात या सावकारांना आतापर्यंत १८ लाख रुपये व्याजापोटी अदा केले. तरीही नऊ मेस रामबापू व हरळ याने पाटील यांच्या घरी जात व्याज व मुद्दल रक्कमेचा मोबदला मागितला आणि कोऱ्या धनादेशाच्या मोबदल्यात ५० हजाराची खंडणी मागितली. अन्यथा, पाटील यांचे हातपाय तोडून टाकू, अशी धमकी दिली. त्यामुळे पाटील यांनी बँक खात्यातून फोन पेव्दारे ५० हजाराची रक्कम या सावकारांना दिली. यात या सावकारांनी रामेश्वर बापू चौधरी यांच्याकडूनही पाटील यांना पैसे आणून दिल्याचे सांगितले, असे फिर्यादीत नमूद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sprouted Potatoes: मोड आलेले बटाटे खायचे की नाही? आरोग्यावर काय होतो परिणाम, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शिवा शर्मा हत्याकांडातील आरोपी श्रद्धा दुबेसह तिघांना न्यायालयात हजर करणार

Shocking : धक्कादायक! पोलिसाने राहत्या घरात आयुष्य संपवलं; अमरावतीत खळबळ

8th Pay Commission: १४.३% वाढ की १४०% पगारवाढ? ₹६९ हजार पगाराचा आकडा चर्चेत कसा आला? जाणून घ्या...

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

SCROLL FOR NEXT