Dhule News Suicide Case Saam tv
महाराष्ट्र

Suicide Case: आजाराला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

आजाराला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

पिंपळनेर (धुळे) : चिंचपाडा पो. बोदगाव (ता. साक्री) येथील रहिवासी व पांगण (ता. साक्री) येथील आश्रम शाळेतील शिक्षकाने आजाराला कंटाळून (Suicide) आत्‍महत्‍या केली. कॅन्‍सर झाल्‍याने चार महिन्‍यांपुर्वीच ऑपरेशन झाले होते. परंतु, सुधारणा होत नसल्‍याने शिक्षकाने आत्‍महत्‍या केली. (Dhule News Teacher Suicide)

चिंचपाडा (ता. साक्री) येथील छोटू झिपरु पवार (वय ५०) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या शिक्षकाचे नाव आहे. त्‍यांना मागील एक वर्षापासून जिभेचा कॅन्सर होता. त्यांचे चार महिन्यापूर्वी ऑपरेशन झाले होते. ऑपरेशन करून देखील त्यांचा आजार बरा न झाल्याने त्यांच्या मानेला कॅन्सरच्या गाठी झाल्या.

विहिरीत उडी मारून संपविले जीवन

त्यांनी या आजाराला कंटाळून शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यांना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. नुक्ते यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत राजेंद्र पवार यांच्या माहितीनुसार पिंपळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT