Sakri News Saam tv
महाराष्ट्र

Sakri News : मद्यप्राशन करून शिक्षक टल्ली; आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळेतील चित्र, विद्यार्थ्यांना सोडून शिक्षक गायब

Dhule News : साक्री तालुक्यातील पवारपाडा धोंगडे दिगर येथील जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षक असून दोघांपैकी दररोज एक शिक्षक अलटून पलटून विनाकारण सुट्टीवर असतो.

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यातील आदिवासी भागातील पवारपाडा धोंगडे दिगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा (Dhule) मनमानी कारभार परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला. जिल्हा परिषदेच्या शाळेतील (Teacher) शिक्षक विद्यार्थ्यांना रामभरोसे सोडून मद्यधुंद अवस्थेमध्ये शाळेत आढळून आले आहेत. (Maharashtra News)

साक्री (Sakri) तालुक्यातील पवारपाडा धोंगडे दिगर येथील जिल्हा परिषद शाळेत (Zp School) दोन शिक्षक असून दोघांपैकी दररोज एक शिक्षक अलटून पलटून विनाकारण सुट्टीवर असतो. जे शिक्षक शाळेमध्ये उपस्थित असतात, ते दिवसभर विद्यार्थ्यांना रामभरोसे सोडून देतात व स्वतः मध्य प्राशन करून येत असल्याची तक्रार पालकांची होती. आदिवासी संघटनांच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित शाळेत अचानक जाऊन पाहणी केली असता त्यादरम्यान हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शाळेमध्ये उपस्थित असलेले शिक्षक हे मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचे आढळून आले आहे. तर शाळेत एकही विद्यार्थी बाकावर बसलेला आढळून आला नाही. त्यामुळे आता या कामचुकार व मद्यप्राशन करणाऱ्या शिक्षकांवर शिक्षण विभाग कारवाई करणार का? व शेजारच्याच जिल्ह्यातील आदिवासी विकास मंत्री या प्रकरणाला गांभीर्याने घेणार का? हे बघणं औचित्याच ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT