Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: तलवारींचा साठा पुन्हा जप्त; शिरपूर पोलिसांची कारवाई, दहा जण ताब्‍यात

तलवारींचा साठा पुन्हा जप्त; शिरपूर पोलिसांची कारवाई, दहा जण ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा पोलिसांना आढळून आला आहे. शिरपूर (Shirpur) तालुक्यातील सांगवी पोलिसांनी ही दमदार कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान जवळपास दहा जणांच्या पोलिसांनी मूसक्या देखील आवळल्या आहेत. (Breaking Marathi News)

शिरपूर तालुका पोलीस अधिकाऱ्यांना गुप्त माहिती दारामार्फत माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेड चेक पोस्ट येथे सापळा रचला. या सापळा दरम्यान माहिती मिळालेली कार इंदोरकडून धुळ्याकडे येताना पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तात्काळ संबंधित कार अडवून तपासणी केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तलवारी, गुप्ती त्याचबरोबर चाकू असे धारदार शस्त्र पोलिसांना आढळून आले आहे.

सहा लाखाचा मुद्देमाल जप्‍त

पोलिसांनी (Shirpur Police) कारवाईदरम्यान दहा जणांच्या मुसक्या देखील आवळल्या आहेत. या कारमध्ये १२ तलवारी, २ गुप्ती, १ चॉपर, १ बटनचा चाकू, १ फायटर असा कारसह एकंदरीत सहा लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पकडलेल्या दहाही जणांकडून जप्त केलेल्या भल्यामोठ्या शस्त्रसाठ्यामुळे त्यांचा काही मोठा घातपाताचा बेत होता का? या अनुषंगाने पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT