Gas tanker 
महाराष्ट्र

सुरत– नागपूर महामार्गावर गॅसचा टँकर लिकेज

सुरत– नागपूर महामार्गावर गॅसचा टँकर लिकेज

भूषण अहिरे

धुळे : धुळे तालुक्यातील नेर गावाजवळून गेलेल्या सुरत– नागपूर महामार्गावर गॅसचा टँकर लिकेज झाला. सुदैवाने वेळेतच लिकेज बंद करण्याचे काम सुरू आहे. (dhule-news-surat-nagpur-highway-gas-tanker-leakage)

सुरत– नागपूर महामार्गावरून गॅसने भरलेला टँकर जात असताना नेर गावाजवळ टँकरला अचानक गळती लागली. यामुळे टँकरमधून गॅस लिकेज होवू लागला. परिसरात गॅसचा प्रचंड वास पसरल्‍याने अनेकांच्‍या काळजाचा ठोका चुकला होता. गावातील नागरीकांची देखील धावपळ सुरू झाली होती. त्या संदर्भातील माहिती अग्निशमन विभागाच्या पथकाला मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

वाहतूक थांबविली

गॅस टँकर लिकेजमुळे मोठा अनर्थ टाळण्यसाठी सुरत नागपूर महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक देखील या मार्गावर खोळंबली आहे.

गळती लागलीच थांबविण्याचे काम सुरू

गॅस टँकर लिकेज झाल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण देखील पसरले होते. त्याचबरोबर टँकरमधून होत असलेली गॅस गळती रोखण्यासाठी पथकातर्फे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेच्या संदर्भातील माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी तुषार ढाके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT