Maratha Aarkshan Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : जरांगे पाटलांच्या भूमिकेला समर्थन; धुळ्यात फॉर्म भरो मोहीम

Dhule News : मनोज जरांगे पाटील यांच्यातर्फे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून आंदोलन करण्यात येत आहे.

भूषण अहिरे

धुळे : मराठा आरक्षणासाठी लढा सुरु आहे. आरक्षणासाठी लढा देत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला राज्यभरातून (Maratha Aarkshan) समर्थन दिले जात आहे. जरांगे पाटील यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी (Dhule) धुळ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने फॉर्म भरो मोहीम सुरू करण्यात आली आहे. याला प्रतिसाद देखील मिळत आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यातर्फे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून आंदोलन करण्यात येत आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी व जरांगे पाटील यांनी सगेसोयरे संदर्भात मांडलेल्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी धुळ्यात (Maratha Reservation) सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा बांधवांतर्फे फॉर्म भरण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धुळे शहरातील स्वस्तिक चौक या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने हे फॉर्म मराठा समाजाच्या समाज बांधवांतर्फे भरून घेण्यात येत आहेत. या फॉर्मच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेल्या सगेसोयऱ्या संदर्भातील भूमिकेला आमचे समर्थन असल्याची भूमिका स्पष्ट होणार आहे. या मोहिमेला मराठा बांधवांतर्फे उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला जात असून, मराठा समाजाच्या समाज बांधवांतर्फे हे फॉर्म भरून घेण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT