Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: नववीतील आदिवासी विद्यार्थ्यांची आत्महत्या; दिवाळीच्‍या सुट्या संपल्‍यानंतर गेला होता छात्रालयात

नववीतील आदिवासी विद्यार्थ्यांची आत्महत्या; दिवाळीच्‍या सुट्या संपल्‍यानंतर गेला होता छात्रालयात

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यातील छडवेल कोरडे येथील महात्मा ज्योतिबा फुले छत्रालय येथे पंधरा वर्षीय विद्यार्थ्याने (Student) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साहील दिलीप पाडवी असे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. (Breaking Marathi News)

साहिल दिलीप पाडवी हा विद्यार्थी नंदुरबार (Nandurbar) येथील रहिवासी असून तीन दिवसांपूर्वीच (Diwali) दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर तो या छात्रालयामध्ये आला होता. दुपारच्या सुमारास शाळेतून या विद्यार्थ्याने अचानक निघून जात छात्रालयाच्या रूममध्ये आतमधून दरवाजा बंद करत गळफास घेतला असल्याची माहिती समोर आली. याबाबत निजामपूर (Police) पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून निजामपूर पोलीस या सर्व घटनेचा तपास करीत आहेत.

कुटूंबियांचा आरोप

इयत्ता नववीमध्ये साहील हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. त्याने टोकाची भूमिका का घेतली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या संदर्भात त्याच्या कुटुंबीयांनी आक्षेप नोंदवला असून याला सर्वस्वी संबंधित छात्रालय प्रशासन जबाबदार असल्याचा देखील आरोप कुटुंबीयांनी लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

HBD Ranveer Singh: एकाच वेळी तीन मुलींना डेट...; दिपिका आधी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होता रणवीर सिंग?

SCROLL FOR NEXT