St Strike
St Strike 
महाराष्ट्र

St Strike : निलंबनाची नोटीस घेताना कर्मचारी जमिनीवर कोसळला

भूषण अहिरे

धुळे : विलीनीकरणाच्या यासंदर्भात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कामावर रूजू न होत असलेल्‍या कर्मचारींवर निलंबनाची कारवाई केली जात आहे. यात धुळे (Dhule) येथे निलंबनाची ऑर्डर घेण्यासाठी गेलेल्या एसटी कर्मचाऱ्याची प्रकृती अचानक ढासळली अन्‌ नोटीस घेण्यापुर्वीच कर्मचारी जमिनीवर कोसळल्‍याची घटना घडली.

राज्‍य परिवहन महामंडळातील कर्मचारी गेल्‍या बावीस दिवसांपासून संपावर आहे. राज्‍य शासनाने पगारवाढ मंजूर केल्‍यानंतर देखील संप कायम ठेवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर देखील एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याने एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे थेट आदेश देण्यात आले आहे. यात कामावर येत नसलेल्‍या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले जात आहे.

पडल्‍यानंतर प्रतिसाद नाही

नोटीस बजावल्‍यानंतर निलंबनाची नोटीस घेण्यासाठी गेलेले एसटी कर्मचारी जमिनीवर कोसळल्याने इतर सहकर्मचाऱ्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रकृती ढासळलेल्या कर्मचाऱ्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यास तात्काळ ॲम्बुलन्स बोलून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर सर्व प्रकार सुरू असताना प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची हालचाल न करण्यात आल्याने कर्मचारी संतप्त झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Constable Death: चोरट्यांचा पाठलाग जीवघेणा ठरला; पाठीत विषारी इंजेक्शन खुपसलं, पोलीस जीवानिशी गेला

MS Dhoni- Daryl Mitchell: डॅरील मिचेलने धावत २ धावा पूर्ण केल्या, पण धोनीने स्ट्राईक सोडली नाही - Video

Ghati Hospital : घाटी रुग्णालयातील नर्सेसचे काम बंद; मनुष्यबळ वाढविण्याची मागणी 

Hingoli Krushi Utpanna Bazar Samiti : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हिंगाेलीत आठवड्यातून पाच दिवस हळद खरेदी सुरू करणार

Gallbladder Stone : पित्त खड्यांमुळे होऊ शकतो कर्करोग; वेदना कायमच्या दूर करण्यासाठी ५ रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT