एसटी 
महाराष्ट्र

धुळे : मध्‍यरात्रीपासून ‘एसटी’चे स्‍टेअरींग लॉक

रात्री बारा वाजेपासूनच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.

भूषण अहिरे

धुळे : राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या कर्मचाऱ्यांनी मध्‍यरात्रीपासून राज्‍यव्‍यापी संप पुकारला आहे. मागण्या मान्‍य होईपर्यंत बेमुदत संप सुरू राहणार असून धुळे विभागात देखील पुर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे धुळे विभागातील सर्व बसचे स्‍टेअरींग लॉक झाले आहे.

राज्‍य परिवहन महामंडळाचे राज्य शासनाने विलगीकरण व्हावे; या मागणीसाठी धुळ्यात देखील आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. रात्री बारा वाजेपासूनच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. जोपर्यंत राज्य शासनातर्फे मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हा संप असाच सुरू ठेवणार असल्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे.

एकही बस निघाली नाही बाहेर

धुळे मध्‍यवर्ती बसस्‍थानकात सकाळपासून या ठिकाणी प्रवाशांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी बघावयास मिळत असून रात्री बारा वाजेपासून धुळे मध्यवर्ती बसस्थानकातून एकही बस बाहेर निघाली नाही. यामुळे बाहेरगावी जाण्यासाठी बसस्‍थानकात आलेल्‍या प्रवाशांना परत जावे लागले. अनेकांनी खासगी वाहन करून गावी गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंब्रात इमारतीचा सज्जा कोसलळा, एका महिलेचा मृत्यू

गृहमंत्र्यांचा राजीनामा, २१ जणांचा मृत्यू अन् सोशल मीडियावरील बंदी उठली, नेपाळमध्ये Gen-Z चं आंदोलन मागे

Lal Mathachi Bhaji Recipe : लाल माठाची भाजी आरोग्याला ठरेल फायदेशीर, नेहमी रहाल हेल्दी अन् फिट

Tiger Shroff : टायगर श्रॉफने मुंबईतील आलिशान फ्लॅट विकला, नफा वाचून थक्क व्हाल

आता UPI पेमेंटसाठी मिळणार नवीन पर्याय! या कंपनीने सुरु केली सेवा; सरकारकडून मिळाली मंजुरी

SCROLL FOR NEXT