SSC Exam Saam tv
महाराष्ट्र

SSC Exam: भरारी पथकांची संख्‍या वाढविली; धुळे शिक्षण विभागाचा निर्णय

भरारी पथकांची संख्‍या वाढविली; धुळे शिक्षण विभागाचा निर्णय

भूषण अहिरे

धुळे : दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरवात झाली आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथक (Dhule News) नेमले आहेत. या भरारी पथकांची संख्या सहावरून ११ करण्यात आली आहे. (Maharashtra News)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या (SSC Exam) दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. धुळे जिल्ह्यात परीक्षेसाठी ६६ केंद्र असून यातील १० केंद्र ही अतिसंवेदनशील जाहीर करण्यात आलेली आहेत. या अतिसंवेदनशील केंद्रावर ज्यादा पोलिस बंदोबस्त पोलीस प्रशासनातर्फे तैनात करण्यात आला असून, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये याची खबरदारी पोलीस प्रशासनातर्फे घेतली जात आहे.

परीक्षेसाठी २८ हजार ४४७ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. जिल्ह्यातील ६६ केंद्रापैकी धुळे शहरामध्ये १५, धुळे ग्रामीणमध्ये १६, साक्री तालुक्यात १३, शिरपूर तालुक्यात ९ व शिंदखेडा तालुक्यात १३ केंद्र आहेत. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्या; यासाठी शिक्षण विभागासह जिल्हा प्रशासनातर्फे देखील तयारी करण्यात आलेली असून, यापूर्वी भरारी पथकांची संख्या सहा होती. परंतु आता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता भरारी पथकांची संख्या सहावरून ११ करण्यात आली आहे. त्यामुळे कॉपीबहाद्दरांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उज्जैनमध्ये शाही मस्जिदचा वाद पेटला पोलिसांकडून लाठी चार्ज

Car AC mileage: गाडीत AC लावल्याने मायलेज किती कमी होतं?

Pune Crime: पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'सोबत भयंकर घडलं, ५ लाखांच्या कारसाठी सासरच्यांकडून छळ

Rakul Preet Singh: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला झटका, आयकर विभागाकडून घरासह १२ ठिकाणी छापेमारी, नेमकं प्रकरण काय?

संपूर्ण गावच विक्रीला काढलं! ग्रामस्थांचा टोकाचा निर्णय

SCROLL FOR NEXT