Dhule news Saam tv
महाराष्ट्र

Dhule : नणंदेची तक्रार; सोनगीर ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर अपात्रतेची कारवाई, काय आहे नेमके प्रकरण?

Dhule news : धुळे जिल्ह्यातील सोनगीर ग्रामपंचायतीच्या सरपंचवर कारवाई झाली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये सोनगीर येथील वार्ड क्रमांक एकच्या पोटनिवडणुकीत रंजना मोरे सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या

भूषण अहिरे

धुळे : गावचा कारभारी गावातील वाद असो कि काही समस्या असो सोडविण्यासाठी तत्पर असतो. परंतु याच कारभारीकडून पदाचा गैरवापर केला जात असल्यास प्रशासनाकडून त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येत असते. अशाच प्रकारे धुळ्याच्या सोनगीरच्या महिला सरपंचाकडून सरकारी जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण अंगाशी आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून सरपंचावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. 

धुळे जिल्ह्यातील सोनगीर ग्रामपंचायतीच्या सरपंच रंजना मोरे यांच्यावर कारवाई झाली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये सोनगीर येथील वार्ड क्रमांक एकच्या पोटनिवडणुकीत रंजना मोरे या सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. नामनिर्देशन पत्र भरताना त्यांनी आपण कुठलेही अतिक्रमण केले नसल्याची नोंद केलेली होती. पण त्यांच्यावर प्रत्यक्षात सोनगीर येथे सरकारी जमिनीवर अतिक्रमण असल्याचे आढळून आले आहे. 

नणंदेकडूनच तक्रार 

दरम्यान सरकारी जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाबाबत सोनगीरच्या माजी सरपंच आणि अपात्र झालेल्या महिला सरपंच रंजना मोरे यांच्या नणंद रुक्मिणी ठाकरे यांनी याबाबतर जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. प्राप्त तक्रारीवरून जिल्हा प्रशासनातर्फे या प्रकरणाची चौकशी केली असता त्यामध्ये रंजना मोरे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे आढळून आले. 

जिल्हा प्रशासनाकडून अपात्रतेची कारवाई 

ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांने सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर या तक्रारीची दखल घेतली. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी जिल्हा प्रशासनातर्फे झाल्यानंतर यामध्ये संबंधित सरपंच महिला दोशी आढळल्यानंतर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. नणंदकडून करण्यात आलेल्या तक्रारीने वहिनीला अपात्र व्हावे लागले; यामुळे गावातील राजकारण तापले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET UG Exam: मोठी बातमी! नीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नाशिकमधून एकाला ताब्यात घेतलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यातील तापमानात पुन्हा वाढ

Hypertension Symptoms: शरीरात दिसतायत ही ५ बदलती लक्षणं? वेळेत ओळखा वाढलेल्या ब्लड प्रेशरचा धोका

Jio Recharge Plan: Jioचा फक्त १२५ चा प्लान, कॉलिंग अन् डेटासह मिळणार खूपकाही फायदे

Sanai Chaughade: ३०० कोटींची मालकीण पुन्हा छोट्या पडद्यावर? 'सनई चौघडे' मालिकेत येणार नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT