Theft saam tv
महाराष्ट्र

Dhule: सीसीटीव्‍ही कॅमेरे बंद करून दुकानात चोरी

सीसीटीव्‍ही कॅमेरे बंद करून दुकानात चोरी

भूषण अहिरे

धुळे : चोरी करताना सीसीटीव्‍ही कॅमेरात कैद झाल्‍याने चोर सापडतात. परंतु, चोरांनी शक्‍कल लढवत सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून दुकानात चोरी केली. ही शक्‍कल लढविल्‍यानंतर देखील चोरट्यास चाळीसगाव (Chalisgaon) रोड पोलिसांनी जेरबंद केले. (dhule news Shoplifting by turning off CCTV cameras and theft)

चाळीसगाव रोड पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या अग्रवालनगर परिसरामधील स्टील व्यापाराचे दुकानात रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने पत्रा उचकटून विविध साहित्य चोरून (Theft) नेल्याची घटना उघडकीस आली होती. यासंदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता तपासादरम्यान हाती लागलेल्या सीसीटीव्ही (CCTV Camera) फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले.

दहा घरफोडीचे गुन्‍हे

संशयिताचा कसून तपास केला असता त्यानेच ही चोरी केली असल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले आहे. हा आरोपी सराईत गुन्हेगार असून यावर यापूर्वी देखील दहा ते बारा घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या चोरट्याने अत्यंत शिताफीने सीसीटीव्ही कॅमेरे बंद करत ही चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT