Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: पाण्यासाठी टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

पाण्यासाठी टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील वाडी भोकररोड परिसरामध्ये बहुतांश कॉलनी परिसरामध्ये आठ ते दहा दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा (Dhule Corporation) केला जात नाही. यामुळे संतप्त नागरिकांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढूनच शोले स्टाईल आंदोलन केले आहे. (Dhule News Water Supply Issue)

धुळे (Dhule) शहरात पाण्याची समस्‍या आजही कायम आहे. पाण्याच्या समस्‍येसाठी नागरीकांनी अनेकदा आंदोलन केले. तरी देखील प्रशासनाकडून अजूनपर्यंत तोडगा काढलेला नाही. आठ ते दहा दिवसानंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा प्रशासनातर्फे केला जात असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यामुळेच धुळे शहरातील वाडी भोकर रोड परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून परिसरातील नागरिकांनी अनोख्या पद्धतीने शोले स्टाईल आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला आहे. यावेळी संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

SCROLL FOR NEXT